शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातीने जिंकला पहिला महापौर चषक : मुरगूडची नंदिनी साळोखे चितपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:05 IST

कोल्हापूर : तब्बल दशकानंतर सुरू झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात मुरगूडच्या स्वाती शिंदेने नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट

ठळक मुद्दे अन्य गटात दिशा कारंडे, सृष्टी भोसले यांची बाजीस्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात

कोल्हापूर : तब्बल दशकानंतर सुरू झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात मुरगूडच्या स्वाती शिंदेने नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट काढून एकेरी कसावर चितपट करीत विजेतेपद पटकाविले; तर ६० किलो गटात मुरगूडच्या सृष्टी भोसले, ५५ किलोगटात दिशा कारंडे (शिंगणापूर जि.प. शाळा) हिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अजिंक्यपद पटकाविले.राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात गुरुवारी महिला कुस्तीतील लढती झाल्या. यात खुल्या गटात उपात्य फेरीत उपभारत केसरी नंदिनी साळोखे हिने मुरगूडच्याच वैष्णवी कुशाप्पावर मात करीत अंतिम फेरी गाठली; तर दुसºया उपांत्य फेरीत स्वाती शिंदे (मुरगूड) हिने शिरोळच्या विनया पुजारीवर गुणांच्या जोरावर मात करीत अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीत मुरगूडच्याच साई केंद्राच्या व प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन महिला मल्ल सराव करीत आहेत. त्यांच्यातच अंतिम लढत झाल्याने कुस्तीशौकिनांना कोण जिंकणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेरीस रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते लागलेल्या या कुस्तीत ‘महिला उपभारत केसरी’ राहिलेल्या नंदिनीस पहिल्या फेरीत स्वातीने मजबूत पकड करीत खाली खेचले. त्यानंतर मिळालेल्या संधीवर स्वातीने एकेरी पट काढून एकेरी कसावर तिला चितपट केले. यात १० गुणांसह पहिला महापौर चषक पटकाविण्याची किमयाही स्वातीने साधली. यात मुरगूडच्याच वैष्णवी कुशाप्पाने प्रतिस्पर्ध्यावर मात करीत तिसरा क्रमांक पटकाविला. यातील विजेतीस पन्नास हजार, तर उपविजेतीस २५ हजार व चषक बहाल करण्यात आला.

महिलांच्या ६० किलो गटात सृष्टी भोसले (मुरगूड साई केंद्र) हिने येळवीच्या स्मिता माळीवर मात करीत तिसºया फेरीत प्रवेश केला; तर दुसºया बाजूने विश्रांती पाटील (शिंगणापूर, जिल्हा परिषद शाळा)ने शिरोळच्या प्रतीक्षा देबाजेवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सृष्टी भोसले व विश्रांती पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. पहिल्या फेरीपासून सृष्टीने एकेरी पट काढून विश्रांतीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. यातून सृष्टीचे ५, तर विश्रांतीचे दोन गुण झाले. हीच गुणसंख्या व वरचढ ठरत सृष्टीने विजेतेपद पटकाविले. मुरगूडच्या प्रतीक्षा देबाजेने तिसरा क्रमांक पटकाविला.

अंकिता शिंदे व अंजली पाटील (दोघीही मुरगूड, साई केंद्र) यांच्यात ५५ किलोगटात उपांत्य फेरीची लढत झाली. यात अंकिता शिंदेने गुणांवर मात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसºया उपांत्य कुस्ती लढतीत शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दिशा कारंडेने शिंगणापूरच्याच स्मिता पाटीलला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत दिशा कारंडेने अंकिता शिंदेवर एकेरी कस काढत चितपट केले. यात दिशाने ६-४ अशा गुणफरकाने अंकितावर मात करीत विजेतेपद पटकाविले. या गटात अंजली पाटील (मुरगूड) हिने तिसरा क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन प्रतिमा पाटील, स्वाती कोरी, बक्षीस समारंभ संयोगिताराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी महापौर हसिना फरास, माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांच्यासह महापालिका नगरसेविका व अन्य उपस्थित होते.महापौर चषक महिला कुस्ती स्पर्धेतील विजेत्या स्वाती शिंदेस संयोगिताराजे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, संगीता खाडे, महापौर हसिना फरास, आदी मान्यवर उपस्थित होत्या.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर